Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO : हवेत बंदुकीच्या फैरी झाडून लातूरमधील भूकंपातील मृतांना अभिवादन
लातूर जिल्ह्यातील किल्लारी (killari) येथे 29 वर्षापूर्वी म्हणजेच 30 सप्टेंबर 1993 रोजी झालेल्या भूकंपातील (Earthquake) मृतांना आज जिल्ह्यात अभिवादन करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदर वर्षी आजच्या दिवशी हा कार्यक्रम पार पडत असतो. पोलिस दलाकडून बंदुकीच्या फैरी झाडत भूकंपात प्राण गमावलेल्या लोकांना अभिवादन करण्यात आले.
लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण केले. औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार हे ही यावेळी उपस्थित होते.
भूकंप झालेल्या गावातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज समाधान शिबिराचे देखील आयोजित करण्यात आलं होतं
लातूर जिल्ह्यातील भूकंपग्रस्त 38 गावातील नागरिकांनी आज या ठिकाणी उपस्थिती लावली होती.
प्रशासनातील अनेक उच्च पदस्थ अधिकारी आणि आमदार अभिमन्यू पवार यांच्या समोरच हे प्रश्न मार्गी लावण्याच्या अनुषंगाने काम करण्यात आलं.
लातूर हे नाव जरी घेतले तर आज देखील 30 सप्टेंबर 1993 चा तो दिवस आठवतो. 29 वर्षापूर्वी याच दिवशी लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे 6.4 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला आणि काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले.
52 खेडेगावातील तीस हजाराच्या आसपास घरे आणि आधारभूत सोयीसुविधा कायमच्या नष्ट झाल्या. या धक्क्यात आठ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते.
या भूकंपात सोळा हजारापेक्षा जास्त लोक जखमी झाले. पंधरा हजारा पेक्षा जास्त जणावरांचा मृत्यू झाला होता.
या भूकंपाचा फटका येथेच नव्हे तर राज्यातील अकरा जिल्ह्यांना बसला. भूकंपामुळे तब्बल अकराशे कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले होते.