Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Health Tips : खोकला, सर्दी, सांधेदुखीपासून मुक्ती मिळवण्यासाठी काळीमिरी रामबाण उपाय
तुमच्या स्वयंपाकघरात असलेले अनेक मसाले हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात, ज्याचा आरोग्याला फायदा होतो. यापैकी एक म्हणजे काळी मिरी. जेवणाची चव वाढवण्यासाठी काळी मिरी वापरली जाते. जेवणाची चव वाढवण्यासोबतच काळी मिरी तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजेवणाची चव वाढवण्यासाठी काळी मिरी वापरली जाते. जेवणाची चव वाढवण्यासोबतच काळी मिरी तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
काळ्या मिरीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, अँटिऑक्सिडेंट, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आणि ताप कमी करणारे गुणधर्म असतात.
काळी मिरी हा एक औषधी मसाल्याचा पदार्थ आहे जो कोलेस्ट्रॉल, मधुमेह, थायरॉईड, संधिवात, पीसीओएस, लठ्ठपणा यासह अनेक समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी प्रभावी आहे.
सांध्यासोबतच आतड्यातील जळजळ कमी करण्यासही काळीमिरी उपयुक्त आहे.
रोगप्रतिकारक शक्ती आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा देशी गाईच्या तुपासोबत काळी मिरी खावी.
झोपेच्या वेळी दुधात चिमूटभर सुंठ पावडर टाकून प्यायल्याने चांगली झोप येते आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.