Latur News: लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेची आकर्षक दृश्ये ड्रोन कॅमेऱ्यात कैद
लातूरचं ग्रामदैवत असलेलं सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर यात्रा तब्बल दोन वर्षांनंतर भरली आहे. (ड्रोन सौजन्य महेश खोसे)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेली दोन वर्ष कोरोनामुळे ही यात्रा भरली नव्हती. मात्र गेल्या दोन वर्षांची कसर या यात्रेत भरुन निघाली आहे.
यंदा या यात्रेचं स्वरुप भव्य ठेवण्यात आलं आहे. जवळपास 17 दिवस ही यात्रा चालते.
17 दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते
महाशिवरात्रीच्या दिवशी यात्रेला प्रारंभ होतो.
संध्याकाळी या यात्रेचा परिसर हा उजाळून निघतो.
या यात्रेचं विहंगम दृश्यं महेश खोसे या तरुणाने आपल्या ड्रोन कॅमेऱ्यातून टिपण्याचा प्रयत्न केला आहे.
मराठवाडा तेलंगणा आणि कर्नाटक भागातून ही भाविकांची गर्दी होत आहे.
बालकांसाठी खेळणी व इतर मनोरंजनाची साधने आहेत
यात्रेनिमित्ताने आनंदमेळा, रहाट पाळणे यांची उभारणी सुरु आहे