Hingoli ZP School : वाढत्या तापमानामुळे हिंगोलीत आजपासून सकाळी 7 वाजता शाळा भरणार
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा या सकाळच्या सत्रात भरणार असून सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत या शाळा सुरु राहणार आहेत.
बारा वाजता सर्व शाळा सोडण्याचे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी काढले आहेत.
सकाळच्या सत्रात जरी या शाळा भरवल्या जात असतील तरीही आठ तासिका घेण्याचे सुद्धा आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान जिल्ह्यामध्ये मागील आठ दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे वाढत्या तापमानाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होऊ नये यामुळे शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.
यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या झळा बसू लागल्या. त्यामुळे कमाल तापमान पुढच्या काही काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी महिन्यामध्ये तापमानात झालेली वाढ पाहता यंदाचा उन्हाळ्यात अधिक उष्णतेचा मारा सहन करावा लागणार, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
दुपारी कोणताही वर्ग भरवू नये असंही शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आलं आहे.
या निर्णयानुसार आज सकाळी सात वाजल्यापासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट पाहायला मिळत आहे.