Latur Fire: लातुरात प्रसिद्ध वारद मेडिकल स्टोअर्सला भीषण आग, लाखो रुपयांची औषधं जळून खाक
Latur Fire: लातूर शहरातील प्रसिद्ध असलेल्या वारद मेडिकल स्टोअर्सला मध्यरात्री भीषण आग लागली असून आगीत लाखो रुपयांची औषधं जळून खाक झालीत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलातूर शहरातील गांधी चौक भागातील वारद मेडिकल स्टोअर्सला काल मध्यरात्री आग लागली होती. आगीचं कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाही.
बंद असलेल्या दुकानातून धूर बाहेर येत होता. याची माहिती बाजूलाच असलेल्या गांधी चौक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना मिळाली.
तात्काळ घटनास्थळी दाखल होत यंत्रणा उभी करण्यात आली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
अग्निशमन दलानं शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवलं.
वारद मेडिकल स्टोअर्स हे लातूर शहरातील नावाजलेलं दुकान असून येथे होलसेल आणि किरकोळ स्वरूपात औषधाची विक्री होत असते.
मध्यरात्री बारा वाजेपर्यंत दुकान सुरू असतं. दुकान बंद करुन गेल्यानंतर ही आग लागली.
दुकानातील लाखो रुपयांची औषधं आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहेत. त्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.
आगीमुळे काही काळ आजुबाजूच्या परिसरात खळबळ माजली होती.