Kolhapur News : मंत्री चंद्रकांत पाटलांविरोधात कोल्हापुरात ठाकरे गटाकडून आंदोलन

मंत्री चंद्रकांत पाटलांविरोधात कोल्हापुरात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

कोल्हापुरात शिवाजी चौकामध्ये पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून पाटील यांचा तीव्र शब्दात निषेध केला.
अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यामध्ये शिवसेनेचा काही संबंध नव्हता अशा पद्धतीचे वक्तव्य पाटील यांनी केले होते.
त्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले
यावेळी पाटील यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
कुठेही नाक खूपसून आपण वेगळे आहोत हे दाखवून देण्याचा पाटील यांचा जुना धंदा असल्याचा हल्लाबोल जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केला.
यावेळी शहर प्रमुख सुनील मोदी, रवी इंगवले यांच्यासह संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य त्यांचे वैयक्तिक असल्याचे म्हटले आहे.
नेते आशिष शेलार यांनी ते वक्तव्य टाळता आले असते, असे म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांनीही चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
ख्यमंत्र्यांना बाळासाहेबांचा वारसदार कोण म्हणणार? हिंमत असेल चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या, अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्ला चढवला आहे.