कोल्हापुरात आजपासून पोलो मैदानावर 'द राॅयल हाॅर्स शो'चा थरार
कोल्हापुरातील पोलो मैदानावर आजपासून (10 मार्च) द रॉयल हॉर्स शो सुरु होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामध्ये 250 घोडेस्वार सहभागी होत असल्याची माहिती कोल्हापूर इक्वेस्टरियन असोसिएशनचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी दिली.
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा शो होत आहे.
13 मार्चपर्यंत हा शो होणार आहे.
स्पर्धेसाठी 20 थरोब्रेड, 40 काठेवाड, 20 मारवाडी असे एकूण 80 घोडे आणि 250 घोडेस्वार सहभागी होणार आहेत.
विशाल बिशनोई (अहमदाबाद) व हृदय छेडा (जर्मनी) स्पर्धेत परीक्षक म्हणून काम करणार आहेत.
आजच्या पिढीला घोडेस्वारीचे प्रशिक्षण मिळावे, या हेतूने शोचे आयोजन केल्याचे मालोजीराजे यांनी सांगितले.
स्पर्धेनिमित्त विविध क्रीडा प्रकारांत ठसा उमटवणाऱ्या खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे.
काेल्हापूरातील ही स्पर्धा म्हणजे अश्वप्रेमींसाठी एक पर्वणीच ठरणार आहे.
घोडेस्वार पुन्हा तयार व्हावेत, हीच आमची इच्छा असल्याचे मालोजीराजे यांनी सांगितले.