कोल्हापुरात 'मिलेट वॉक' आणि 'मिलेट बाईक रॅली'च्या माध्यमातून जनजागृती
कोल्हापुरात 'मिलेट वॉक' आणि 'मिलेट बाईक रॅली'च्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकृषी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मिलेट वॉक रॅलीचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते तर मिलेट बाईक रॅलीचे उद्घाटन विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आले.
रॅलीनंतर शाहू स्मारक सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सहभागी मान्यवरांना प्रातिनिधिक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
पारंपरिक हलगी वादन, जनजागृतीपर संदेश देणारे माहिती फलक, फेटे आणि आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचा लोगो असणारी टोपी घातलेले विविध विभागांचे अधिकारी, शास्त्रज्ञ, प्रगतशील शेतकरी, कर्मचारी, नागरिक, लहान मुले यांचा उत्साह मोठा होता.
रॅली दरम्यान मिलेट (पौष्टिक तृणधान्य) तसेच माहिती पुस्तिकेचे नागरिकांना वाटप करण्यात आले.
मिलेट बाईक रॅलीचा मार्ग- सायबर कॉलेजपासून आईचा पुतळा-राजारामपुरी मुख्य रस्ता-बागल चौक-पार्वती टॉकीज-शाहूपुरी मेन रोड-गोकुळ हॉटेल-व्हिनस कॉर्नर-फोर्ड कॉर्नर- आयोध्या टॉकीज मार्गे दसरा चौकात मिलेट बाईक रॅलीचा समारोप करण्यात आला.
मिलेट वॉक रॅलीचा मार्ग- दसरा चौक पासून लक्ष्मीपुरी-बिंदू चौक-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे दसरा चौकात मिलेट वॉक रॅलीचा समारोप करण्यात आला.
हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 म्हणून साजरे करण्यात येत आहे.
रॅलीनंतर झालेल्या कार्यक्रमात बोलताना डॉ. प्रवीण मतिवाडे म्हणाले, चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक तृणधान्य पिकवणे, त्यापासून विविध पदार्थ बनवणे व ते पदार्थ खाण्यासाठीची साखळी तयार व्हायला हवी. जेणेकरुन भारत देशाची भावी पिढी आणखी सदृढ व सक्षम होईल.