Maize : देशातून मका निर्यातीत मोठी वाढ
आंतरराष्ट्रीय बाजारात मकेच्या (Maize) मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं भारतातून होणारी मका निर्यात (Maize Export) देखील वाढली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकृषी मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार 2022-23 मध्ये मकेच्या निर्यात 1.5 टक्क्यांची वाढ झाली आहे.
या वर्षात 6 हजार 507 कोटी रुपयांच्या मका निर्यात झाल्याची माहिती कृषी मंत्रालयानं दिली आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात मकेच्या दरात वाढ झाली आहे. मागणी वाढल्याने दरात वाढ झाली आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये मक्याला प्रति क्विंटल दोन हजार ते दोन हजार 300 रुपयांचा दर मिळत आहे.
निर्यातीसाठी मक्याचे दर हे दोन हजार 300 ते दोन हजार 500 रुपयांच्या दरम्यान आहेत.
सध्या भारताला अग्नेय आशिया आणि पूर्व आशियातील देशांना निर्यातीसाठी वाहतूक खर्च कमी लागत आहे. त्यामुळं या देशांनी मका निर्यात वाढवली आहे.
यावर्षी जगातील काही प्रमुख मका उत्पादक देशातील उत्पादनात घट झाली आहे. उत्पादन घट झाल्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात मकेचा तुटवडा भासत आहे.
यंदा अमेरिका, अर्जेंटिना, रशिया आणि युक्रेन या महत्त्वाच्या देशांमधील मका उत्पादन घटलं आहे.
अमेरिकेतील उत्पादन यंदा 411 लाख टनाने मकेचे उत्पादन कमी झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या मकेला मागणी वाढली आहे.