Shivaji Maharaj Rangoli : तब्बल 35 टनाच्या रांगोळीतून छत्रपती शिवराय साकारले; महाराजांची आजवरची सर्वात मोठी रांगोळी, 350 महिला अन् अनेक विद्यार्थिनींचा हातभाराने
Shivaji Maharaj Rangoli : कोल्हापूर मधील वारणा नगरमध्ये शिवरायांची सर्वात मोठी रांगोळी साकारण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजमाता जिजाऊ जयंती निमित्ताने कोल्हापुरातल्या वारणानगर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची आजवरची सर्वात मोठी रांगोळी साकारली आहे..
तब्बल 35 टन रांगोळीचा वापर यासाठी करण्यात आलाय.
ही रांगोळी जवळपास 5 लाख स्क्वेअर फुटांची आहे..
विशेष म्हणजे आजवर 5 लाख स्क्वेअर फुट इतकी भव्य दिव्य रांगोळी कधीच साकारली नाहीये..
म्हणूनच याचा विश्वविक्रम सुद्धा होणार आहे..
पन्हाळा शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनय कोरे यांच्या पुढाकारातून ही भव्य दिव्य रांगोळी साकारण्यात आली आहे...
ही रांगोळी साकारण्यासाठी तब्बल 350 महिला आणि अनेक विद्यार्थिनीचा हातभार लागला आहे.
दरम्यान, शिवाजी महाराजांची ही सर्वात मोठी रांगोळी पाहण्यासाठी स्थानिक लोकांनी मोठी गर्दी केली आहे.
शिवाजी महाराजांची मनमोहक रांगोळी साकारल्याने सर्वांकडून कौतुक होत आहे.