Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला जाणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या आरोग्यावर थोडं लक्ष देण्याची गरज आहे. तसेच, तुमचं वैवाहिक जीवन चांगलं राहील.
वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या काळात तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. तुमच्या व्यवसायाचा अधिक विस्तार झालेला दिसेल. तसेच, या काळात पैशांची गुंतवणूक करताना सावधानता बाळगणं गरजेचं आहे.
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे जास्त लक्ष केंद्रित करावं.
कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे.या आठवड्यात तुमच्याकडून अनेकांच्या अपेक्षा असतील. त्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तसेच, वातावरणातील बदलांमुळे तुम्हाला सर्दी, खोकला, घसादुखीचा त्रास होऊ शकतो.
डिसेंबर महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला आर्थिक चणचण भासणार नाही.
कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या काळात तुमचा व्यवसाय चांगला चालेल. तुम्हाला तुमच्या उत्पन्नातून अधिक लाभ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)