Kolhapur Football : रोमहर्षक लढतीत 'दिलबहार'ने पटकावला सतेज चषक; बालगोपाल ठरला उपविजेता
दिलबहार तालीम मंडळाने बालगोपाल तालीम मंडळाचा पराभव करत सतेज चषक पटकावला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदोन मातब्बर संघांचा खेळ पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी खचाखच गर्दी केली होती.
दिलबहारच्या शुभम घराळेनं चार पेनल्टी रोखत विजयाचा मार्ग प्रशस्त केला.
निर्धारित वेळेत सामना 1-1 बरोबरीत राहिल्यानंतर टायब्रेकरमध्ये दिलबहारने 3-1 ने विजय मिळवला.
विजेत्या दिलबहार तालीम मंडळास व उपविजेत्या बालगोपाल तालीम मंडळास तसेच स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूंना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.
यावेळी बुलेटने आमदार ऋतुराज पाटील यांनी राईड मारली.
यावेळी रोहित आर.पाटील, सचिन चव्हाण, शारंगधर देशमुख, राजू लाटकर, डॉ. भारत कोटकर, भूपाल शेटे यांच्यासह पीटीएम फुटबॉल संघाचे अध्यक्ष शरद माळी, कार्याध्यक्ष संपत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेतून फुटबॉलप्रेमी कोल्हापूरकरांना फुटबॉलची पर्वणी अनुभवायला मिळाली.
फुटबॉलप्रेमींना लकी ड्राॅच्या माध्यमातून बक्षीस देण्यात आले.
विजेत्या दिलबहार संघात 2 लाख रुपये व सतेज चषक देण्यात आला.
उपविजेत्या बालगोपाल संघात 1 लाख आणि चषक देण्यात आला.