Birthday Cake : होऊ दे खर्च, चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त वरना कारची प्रतिकृती असलेला केक, वजन तब्बल...
221 किलो वजनाचा हा चॉकलेट केक वेरना कारच्या स्वरुपात बनवण्यात आला. केकच्या इंडस्ट्रीमध्ये प्रथमच ऐवढा मोठा केक बनवण्यात आला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App221 किलो वजनाचा केकने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. केक इंडस्ट्रीमध्ये प्रथमच एवढा मोठा केक बनवला गेला होता.
वसईच्या कामण येथील डोंगरी येथे राहणाऱ्या नवीन भोईर आणि शुभांगी भोईर या दाम्पत्याला लग्नाच्या सहा वर्षानंतर, 4 मार्च रोजी रेयांश हा गोड मुलगा झाला.
त्यात जवळपास एक महिना तो एनआयसीयूमध्ये उपचारार्थ दाखल होता. त्यामुळे त्याचा वाढदिवस दणक्यात साजरा करण्याचा विडाच भोईर दाम्पत्याने उचलला होता.
वसईच्या कामण येथील डोंगरी येथे राहणाऱ्या नवीन भोईर आणि शुभांगी भोईर या दाम्पत्याला लग्नाच्या सहा वर्षानंतर, 4 मार्च रोजी रेयांश हा गोड मुलगा झाला.
मागील वर्षी रेयांशच्या पहिल्या वाढदिवसाला त्यांनी हॅलिकॉप्टरमधून मुंबईहून वसईच्या कामण इथे एन्ट्री घेतली होती.
एवढी मोठा केक बनवण्याचं आव्हान मॉन्जिनीज कंपनीने उचललं होतं. भिवंडीच्या मॉन्जिनीज केकच्या दुकानात ही ऑर्डर देण्यात आली होती.
रेयांश हा आमच्यासाठी देवाचं गोड गिफ्ट आहे आणि त्यामुळेच त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला काहीतरी वेगळं करण्याचा संकल्प करत असल्याची प्रतिक्रिया नवीन भोईर यांनी दिली.