Kolhapur Rain Update: कोल्हापुरात पुन्हा दमदार; पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल, राधानगरी धरणाच्या पाण्यातही वेगाने वाढ
कोल्हापूर (Kolhapur News) शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी उघडझाप केल्यानंतर आज (22 जुलै) शनिवारी पुन्हा एकदा पावसाने जोर पकडला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावसाने विविध नद्यांवरील 75 बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
बंधारे पाण्यात गेल्याने अन्य पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वेगाने होत आहे. त्यामुळे नदीने इशारा पातळीकडे वाटचाल सुरु केली आहे.
राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगेची पाणी पातळी 36 फुट 4 इंचावर पोहोचली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फुट असून धोका पातळी 43 फूट आहे.
बंधारे पाण्याखाली एसटीच्या सेवेवरही परिणाम झाला असून अनेक मार्गावर एसटी बंद करण्यात आली आहे.
जिल्हा मार्ग असलेल्या 122 पैकी 10 मार्ग बंद असल्याने एकूण 15 मार्गांवर वाहतूक बंद आहे. धरणांच्या पाण्यात वेगाने वाढ
राधानगरी धरणातील पाणीसाठ्यात गेल्या 24 तासात साडे तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. धरणात आता 73.34 टक्के पाणीसाठा झाला आहे.
त्याचबरोबर कासारी, कडवी आणि कुंभी धरणातही 70 टक्के पाणीसाठा झाला आहे.
वारणा धरणातही 64 टक्के पाणीसाठा झाला आहे.
काळम्मावाडी धरणातही वेगाने साठा होत आहे.
धरणात 9.31 टीएमसी पाणीसाठा झाला असून 36. 67 टक्के पाणीसाठा झाला आहे.