Parenting Tips : लहान मुलांना ड्रायफ्रूट्स खाऊ घालण्याचा उत्तम उपाय; 'या' पदार्थाचा समावेश करा
सुक्या मेव्यांचा आणि नट्सचा मुलांच्या आहारात समावेश करणे आवश्यक आहे. जर मुले ड्रायफ्रुट्स खात नसतील तर ही रेसिपी नक्की करून पहा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुका मेवा आणि नट हे मुलांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. मुलांना ड्रायफ्रूट्स खायला दिल्यास रोगप्रतिकारशक्ती आणि मेंदू मजबूत होतो.
यामुळे शरीरात झिंक, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वांची कमतरता होत नाही. जर मूल ड्रायफ्रुट्स खात नसेल तर तुम्ही त्याला ड्रायफ्रुट्सपासून बनवलेला हा पदार्थ देऊ शकता.
मुलांना तुम्ही पुडिंग आणि ब्राउनीजमध्ये ड्रायफ्रूट्स खायला घालू शकतात. अशा प्रकारे मुलांना ड्राय फ्रूट्स आवडू लागतील.
काजू, पिस्ता, बदाम, कोरडी जर्दाळू बारीक करून पावडर बनवा. भाजलेले ओट्स पावडर, ड्राय फ्रूट्स पावडर आणि काही चिरलेले ड्राय फ्रूट्स आणि मनुका मिक्स करा. आणि त्याला वडीसारखा आकार द्या.
ड्रायफ्रूट्स आणि नट्स जॅममध्ये मिसळून ब्रेड किंवा चपातीवर लावल्यास मुले ते आवडीने खातील.
ड्रायफ्रूट्स खायला देण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे काजू, बदाम, अक्रोड आणि पिस्ता मिक्सरमध्ये बारीक करून पावडर बनवणे. लापशी किंवा सेरेलॅक मिसळून खायला द्या.
मुलांना चॉकलेट खायला खूप आवडते. यामधूनही तुम्ही मुलांना सुकामेवा खायला घालू शकता.
लहान मुलांना शेंगदाणे, अंजीर, बदाम आणि इतर फळांमध्ये मिक्स करून त्याचे चाट करून द्या. मुले आवडीने खातील.