कोल्हापूर पोलीस दलातील 45 कर्मचाऱ्यांना पदोन्नती; कळंबा जेलमधील नऊ कैद्यांना शिक्षेत सवलत
कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील 45 पोलीस कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आदेश काढले.
यात पोलीस अंमलदारांपैकी पोलीस हवालदार ते सहायक पोलीस उपनिरीक्षकपदी 14 जणांना बढती मिळाली
पोलीस नाईक ते पोलीस हवालदारपदी 31 जणांना बढती मिळाली.
अधीक्षक पंडित यांनी बढती मिळालेल्या पोलिसांचे अभिनंदन केले.
दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने कळंबा कारागृहातील नऊ कैद्यांना कारागृह प्रशासनाकडून शिक्षेत सवलत मिळाली.
विश्वास सोपान मंडले, विजय नंदकुमार पाटील, विनायक खाशाबा तांबेवाघ, कमलकांत महेशचंद सैनी, सुहास रामचंद्र हाके, मो.रशीद अजगरअली मुल्ला,आशिष राजपाल गजभिये, सुनील शंकर नितनवरे आणि सुरेश बापू कांबळे अशी सवलतपात्र कैद्यांची नावे आहेत.
स्वातंत्र्यदिनी या कैद्यांची कारागृहातून सुटका झाली.
रम्यान, पहिल्या टप्प्यामध्ये 15 ऑगस्ट 2022 रोजी 206 बंदी, दुसऱ्या टप्प्यामध्ये 26 जानेवारी 2023 रोजी 189बंदी कारागृहातून मुक्त करण्यात आलेले आहेत.
तसेच तिसऱ्या टप्प्यामध्ये 15ऑगस्ट 2023 रोजी 186 बंद्यांना विशेष माफी देवून कारागृहातून मुक्त करण्याबाबतचे आदेश शासनाने निर्गमित केले आहेत.
माफी योजनेचा उद्द्येश हा कैद्यांमध्ये शिस्त आणि आचरण निश्चित करणे तसेच कारागृहातून प्रोत्साहन स्वरूपात लवकरात लवकर सुटका करणे हा आहे.