Chandrayaan - 3 : चांद्रयान-3 चंद्राच्या जवळ पोहोचले; आता लँडर आणि प्रोपल्शन मॉड्युल वेगळे करण्याची तयारी सुरु
भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष आता इस्रो (ISRO) च्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेकडे लागलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचांद्रयान-3 या वर्षी 14 जुलै रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आले.
आता चांद्रयान-3 आपल्या मिशनच्या अगदी जवळ पोहोचले आहे. चांद्रयान-3 चंद्रापासून फक्त 150 किमी अंतरावर आहे. आज सकाळी इस्रोने पुन्हा एकदा चंद्राच्या पृष्ठभागापासून अंतर कमी करण्यासाठी कक्षा कमी केली.
चांद्रयान-3 153 किमी x 163 किमीच्या पाचव्या कक्षेत ठेवण्यात आले आहे. या प्रक्रियेचे नाव मॅन्युव्हर आहे. या अंतर्गत, अंतराळ यानाच्या इंजिनचा वापर करून, ते एका विशिष्ट मार्गाने ढकलले जाते, ज्यामुळे त्याचा मार्ग अधिक गोलाकार बनतो. आता हे यान सॉफ्ट लँडिंगसाठी तयार होईल.
17 ऑगस्ट रोजी, प्रोपल्शन आणि लँडर मॉड्यूल वेगळे केले जातील. लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळे झाल्यानंतर आणि अंतराळयान 100 किमी x 30 किमीच्या कक्षेत पोहोचल्यानंतर सॉफ्ट लँडिंगची प्रक्रिया सुरू होते.
लँडर आपल्या थ्रस्टर्सचा वापर करून चंद्राच्या पृष्ठभागावर सुमारे 30 किमी उंचीवर पोहोचतो. त्याच्या सुरक्षित लँडिंगसाठी अचूक नियंत्रण आणि नेव्हिगेशन आवश्यक आहे.
इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ सांगतात की चंद्रयान-3 चा लँडर विक्रम 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करेल. विशेष म्हणजे, इंजिन बिघडले तरी अशा परिस्थितीतही चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग होईल.
सर्व सेन्सर आणि दोन इंजिन काम करू शकले नसले तरी सॉफ्ट लँडिंग सुनिश्चित केले जाईल, असे इस्रो प्रमुख सांगतात. विक्रमला चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याचे सर्वात मोठे आव्हान इस्रोच्या टीमसमोर आहे.
मिशन चांद्रयान-3 14 जुलै रोजी सुरू झाले. 5 ऑगस्ट रोजी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. यानंतर 9 ऑगस्ट, 14 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट रोजी कक्षा बदलण्यात आली. हे चंद्राच्या जवळ आणण्यासाठी केले जाईल, जेणेकरून ते 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकेल.