Rain : उत्तर भारतात मुसळधार पाऊस, उत्तराखंडसह हिमाचलचे मोठं नुकसान
सध्या उत्तर भारतात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक भागात या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
Rain News
1/9
उत्तर भारतात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या सततच्या पावसामुळं उत्तराखंड (Uttarakhand) आणि हिमाचल प्रदेशमध्ये (Himachal Pradesh) मोठं नुकसान झालं आहे.
2/9
मुसळधार पावसामुळं हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये 65 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
3/9
नदी नाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
4/9
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दोन्ही राज्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
5/9
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांमध्ये भूस्खलन, पूर, ढगफुटी आणि अतिवृष्टीमुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
6/9
पाऊस आणि भूस्खलनामुळे येथील पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्या आहेत. तसेच या दोन्ही राज्यात शेती पिकांना देखील मोठा फटका बसला आहे.
7/9
पूरस्थिती निर्माण झाल्यामुळं हिमाचलमध्ये स्वातंत्र्यदिनाचे कोणतेही कार्यक्रम घेण्यात आले नाहीत. साध्या पद्धतीनं सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
8/9
सोमवारपासून सुरु असलेल्या पावसामुळं हिमाचल प्रदेशमध्ये आतापर्यंत सुमारे 55 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
9/9
सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. अडकलेल्या लोकांची सुटका करण्यावर भर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. चंदीगड-शिमला 4-लेन महामार्गासह इतर प्रमुख रस्ते खुले करण्यात आले आहेत.
Published at : 16 Aug 2023 08:57 AM (IST)