Kolhapur : पाण्याचा ठणठणाट, हातात घागरी घेऊन महिला रस्त्यावर
गेल्या महिन्याभरापासून बालाजी पार्क, माढा कॉलनी परिसरातील इतर काॅलन्यांमध्ये पाण्याचा पूर्णतः ठणठणात असल्याने आज संतप्त महिला आणि नागरिकांनी हॉकी स्टेडियम चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन केले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहिलांनी रस्त्यावर टायर टाकून आणि घागरी हातामध्ये घेऊन आंदोलन केले.
यावेळी महिला महापालिकेतील अधिकाऱ्यांवर चांगल्याच आक्रमक झाल्या.
महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढताना तोंड बघून पाणी सोडत सोडत असल्याचा आरोप केला.
माढा काॅलनी, शाहू काॅलनी, बालाजी पार्क, गुरु महाराज नगरी, स्वामी समर्थ अपार्टमेंट, आदी भागातील नागरिकांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले.
गेल्या महिन्याभरापासून आम्ही पाणी विकत घेत असून, आमचे हातावरचे पोट असल्याने आम्ही दररोज पाणी विकत घेऊन पिऊ शकत नाही, अशी भावना आंदोलन करणाऱ्या नागरिक आणि महिलांनी व्यक्त केली.
जर आमच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही, तर निवडणुकीला भागात येऊ देणार नाही, अशी धमकीच यावेळी महिलांनी दिला.
जोपर्यंत आमच्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन माघार घेणार नाही, अशी भूमिका महिलांनी घेतली आहे.
भागातील सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांबळे यांनी या आंदोलनाबाबत पूर्वकल्पना दिली होती, असे म्हणाले.
जर आम्हाला पाणी द्यायचं नसेल तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला येऊन समोर सांगावे, आम्ही आमचं काय ते बघू, मात्र, आमच्या भावनांशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? अशी विचारणा यावेळी संतप्त महिलांनी केली.
जर आमच्या पाणी प्रश्न सुटला नाही, तर आम्ही यापेक्षा उग्र आंदोलन करू असा इशारा भागातील महिलांनी दिला आहे.