Vande Bharat Express: मुंबई- कोल्हापूर मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करा; मंत्री चंद्रकांत पाटील यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
मुंबई- कोल्हापूर या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करावी, अशी मागणी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवून केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवंदे भारत सुरु झाल्याने दोन शहरांच्या प्रवासातील वेळ कमी होईल. तसेच प्रवाशांना सुविधा मिळेल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या रेल्वेमार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली आहे.
मुंबई- कोल्हापूर हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि रहदारीचा मार्ग आहे. कोल्हापूर हे औद्योगिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे शहर असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
कोल्हापुरातील लोक वर्षानुवर्षे नोकरी, व्यवसाय आणि अन्य कारणांनी मुंबईशी जोडले आहेत.
सध्या दोन रेल्वे मुंबई-कोल्हापूर मार्गावर धावतात. मात्र, प्रवाशांची संख्या पाहता त्या पुरेशा नाहीत.
दररोज हजारो लोक बस, खासगी वाहन यातून मुंबईचा प्रवास करतात.
जर वंदे भारत एक्स्प्रेस या मार्गावर सुरू झाली, तर प्रवाशांचा वेळ वाचेलच, पण इंधनाचीही बचत होईल.
प्रवासाचा वेळ कमी झाल्याने प्रवासी संख्याही वाढेल. मुंबई- कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा ताणही कमी होईल.
त्यामुळे मुंबई- कोल्हापूर शहरांना जोडणारी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.