कोल्हापूर : दसरा चौकातील शाहू स्मारक भवनमध्ये 21 ते 25 जून राजर्षी शाहू व्याख्यानमाला; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे राजर्षी शाहू महाराजांच्या 149 व्या जयंतीनिमित्त विविध विषयांवरील राजर्षी शाहू व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे 21 ते 25 दरम्यान सायंकाळी सहा वाजता व्याख्यान होईल.
21 जून रोजी श्रीराम पवार यांचे ‘रशिया-युक्रेन युद्ध व त्याचे परिणाम’ या विषयावरील व्याख्यानाने या व्याख्यानमालेला सुरवात होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.
22 जून रोजी डॉ. विलास पवार यांचे ‘राजर्षी शाहू महाराजांच्या प्रशासकीय सुधारणा’ या विषयावर व्याख्यान होईल. डॉ. अवनिश पाटील अध्यक्षस्थानी असतील.
23 जून रोजी प्रा. जी. ए. उगले (पैठण) यांचे ‘सत्यशोधक समाज : काल, आज आणि उद्या’ या विषयावर व्याख्यान होईल.अध्यक्षस्थानी डॉ. जयसिंगराव पवार असतील.
24 जून रोजी किशोर बेडकिहाळ (सातारा) यांचे ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विचारांचे समकालीन महत्त्व’ या विषयावर व्याख्यान होईल.
25 जून रोजी डॉ. शिवाजी पाटील (सातारा) यांचे ‘भारतीय राज्यघटनेचा मूलभूत संरचना सिद्धांत आणि लोकशाही’ या विषयावर व्याख्यान होईल.
ही सर्व व्याख्याने समाजोपयोगी आहेत. त्यामुळे सर्वच स्तरातील लोकांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेखावार यांनी केले आहे.
दरम्यान, कोल्हापूरातील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टकडून देण्यात येणारा 'राजर्षी शाहू पुरस्कार' ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग या दाम्पत्याला (Abhay Bang and Rani Bang) जाहीर झाला आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला 'राजर्षी शाहू पुरस्कार' देऊन सन्मान दिला जातो.