Kolhapur News: कोल्हापूरची पंचगंगा प्रदूषीत, तेरवाड बंधाऱ्यात लाखो मासे मृत्युमुखी

पंचगंगा इतकी प्रदूषित झालीय की माशांचा श्वास गुदमरल्यानं जिकडं बघाव तिकडं मृत माशांचा खच पडलाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हा प्रश्न भेडसावत आहे. या परिसरातील नागरिकांनाही या प्रदूषणाला सामोरं जावं लागतंय.

मात्र याकडे ना प्रशासनाचं लक्ष आहे ना सत्ताधाऱ्यांचं. दरवर्षी लाखो जलचर असं तडफडून मरत आहेत
नागरिकांना प्रदूषणाचा त्रास कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या काठावर शेकडो गावं आहेत.
मात्र या नदीचं पाणी ना जनावरांना देता येतं ना माणसांना याचा पिण्यासाठी वापर करता येतो.
नदीच्या या प्रदूषणामुळं शेत जमिनीचे मोठं नुकसान होतंय.
या सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या मेलेल्या माशांमधील अर्धमेले मासे काहीजण विक्रीसाठी घेऊन जात आहेत.
त्यामुळं या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झालाय.
या प्रश्नावर नागरिकांनी अनेक आंदोलनं केली. त्याला प्रतिसाद देत प्रशासन तात्पुरती कारवाई करतं आणि पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या' असंच सुरु राहतं.