Glenn Maxwell : पायात गोळा आला तरी एकटाच नडला; अशी होती मॅक्सवेलची ऐतिहासिक खेळी; पाहा फोटो

Glenn Maxwell ने त्याच्या आयुष्यातली सर्वोत्तम खेळी आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर साकारली. त्यानं प्रतिकूल परिस्थितीत आणि केवळ एका पायावर साऱ्या शरीराचा तोल पेलून नाबाद 201 धावांची खेळी केली.

Glenn Maxwell : पायात गोळा आला तरी एकटाच नडला; अशी होती मॅक्सवेलची ऐतिहासिक खेळी; पाहा फोटो

1/7
ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलनं त्याच्या आयुष्यातली सर्वोत्तम खेळी आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर उभारली.
2/7
त्यानं प्रतिकूल परिस्थितीत आणि केवळ एका पायावर साऱ्या शरीराचा तोल पेलून 128 चेंडूंत नाबाद 201 धावांची खेळी केली.
3/7
मॅक्सवेलच्या या खेळीला 21 चौकार आणि 10 षटकारांचा साज होता. त्याच्या याच खेळीनं ऑस्ट्रेलियाला विश्वचषकात एक रोमांचक विजय मिळवून दिला.
4/7
या सामन्यात अफगाणिस्ताननं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 292 धावांचं लक्ष्य दिलं होतं.
5/7
त्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची 19 व्या षटकात सात बाद 91अशी दाणादाण उडाली होती.
6/7
त्या परिस्थितीत ग्लेन मॅक्सवेलनं कर्णधार पॅट कमिन्सला हाताशी धरून ऑस्ट्रेलियाचा किल्ला लढवला. त्या दोघांनी आठव्या विकेटसाठी 202 धावांची अभेद्य भागीदारी रचली.
7/7
त्यात कमिन्सचा वाटा 68 चेंडूंत नाबाद 12 धावांचा होता.
Sponsored Links by Taboola