Ambabai Mandir : अंबाबाई मंदिरात दुसऱ्या दिवशी 1 लाख 36 हजारांवर भाविकांचे दर्शन; देवीची दुसऱ्या माळेला महागौरीच्या रुपात पूजा
शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेला करवीर निवासिनी श्री अंबाबाईची महागौरी रूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुर्गेच्या नऊ रूपातील हे आठवे रूप आहे.
महागौरी ही गौरवर्णाची आहे. अष्टवर्षा भवेद गौरी म्हणजे ती आठ वर्षाची आहे.
वस्त्रालंकार श्वेत वर्णाचे आहे. ही देवी चतुर्भुज असून, तिचे वाहन वृषभ आहे.
ही पूजा आनंद मुनीश्वर, किरण मुनिश्वर, चैतन्य मुनिश्वर, मयूर मुनिश्वर, श्रीनिवास जोशी, सचिन गोटखिंडीकर यांनी बांधली.
image 6वरच्या उजव्या हातात अभय मुद्रा, खालच्या हातात त्रिशूळ, वरच्या डाव्या हातात डमरू खालच्या हातात वरमुद्रा आहे.
अशक्य कार्य सिद्धीला जातात पुराणामध्ये तिचा महिमा खूप वर्णन केला आहे. अशा या महागौरी रूपात अंबाबाईची सालंकृत पूजा झाली.
दुसरीकडे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज देवीचे दर्शन घेतले. आज दुसऱ्या दिवशी मंदिरात 1 लाख 36 हजारांवर भाविकांनी दर्शन घेतले.