Navratri 2023 : साडेतीन शक्तीपिठाचे राज्यातील एकमेव कोल्हारमधील मंदिर, भगवती मातेच्या मंदिरात नवरात्रीनिमित्त भाविकांची गर्दी
मात्र तुम्हाला तुळजापूरची भवानीमाता, माहूरची रेणूका, कोल्हापूरची भगवती आणी वणीच्या सप्तश्रृंगी मातेचे दर्शन एकाच ठिकाणी करता येणं शक्य आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिर्डी आणी शिंगणापूरच्या मध्यावर अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार गावात हे आगळ वेगळ मंदिर आहे.
जिथे साडेतीन शक्तीपिठांचे एकत्रित दर्शन घेता येईल.
नवरात्रीचा मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो.
शेकडो वर्षापूर्वी भक्ताच्या इच्छेखातर या सर्व देवींनी भक्ताला दर्शन दिल्याची या मंदिराची आख्यायीका आहे.
नवरात्रीत लाखो भक्त देवीच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे मंदिर प्रशासनाने देखील उत्सवाची जय्यत तयारी केली आहे.
शनी शिंगणापूर ते शिर्डीच्या दरम्यान असलेल्या मार्गावर हे मंदिर आहे.
त्यामुळे दररोज हजारो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात.
तर दसरा होईपर्यंत या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.