Health Tips : हेल्थी राहण्याकरता करा 'हे' घरगुती उपाय, घ्या जाणून सविस्तर
सफरचंद सोलून त्याचे बारिक तुकडे करावेत. या तुकड्यांना थोडे मीठ लावून सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास डोकेदुखी कमी होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमासिक पाळीाचा जास्त त्रास होत असेल तर थंड पाण्यात लिंबाचा रस पिळून ते पाणी प्यावं.
त्वचाविकार झाला असल्यास कच्च्या बटाट्याचा रस लावावा.
लोण्यात थोडे केसर मिसळून ओठांना दररोज लावल्यास ओठांचा काळेपणा कमी होईल.
तोंडाला दूर्गंध येत असेल तर दालचिनीचा तुकडा तोंडात ठेवल्यास वास येत नाही.
सर्दी झाली असेल तर युकेलिप्टसचे तेल रूमालावर शिंपडावे त्याने आराम मिळू शकतो.
कांद्याची पेस्ट करून काही दिवस केसांना लावल्यास पांढरे केस काळे होऊ शकतात.
चहाच्या उकळलेल्या पाण्याने केस धुतल्यास केसगळती थांबते.
संत्र्याच्या रसात थोडे मध मिसळून ते प्यायल्यास गर्भवतींची अतिसाराची तक्रार दूर होते.
घसा खवखवत असल्यास सकाळी रिकाम्यापोटी बडीशेप चावून खावी.