Ambabai Mandir : करवीर निवासिनी श्री अंबाबाईला भाविकांकडून भरभरून दान
Ambabai Mandir : मंदिराच्या दानपेट्यात 62 लाख 36 हजार 830 रुपयांचे भाविकांकडून दान देण्यात आले आहे. पेटी क्रमांक 4 मधून सर्वाधिक 18 लाख 16 हजार 767 रुपयांचे दान मिळाले.

Ambabai Mandir
1/10
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात गेल्या तीन दिवसांपासून दानपेट्यांमधील रकमेची मोजदाद सुरु होती.
2/10
मंदिरात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेली मोजदाद आज समाप्त झाली.
3/10
मंदिराच्या दानपेट्यात 62 लाख 36 हजार 830 रुपयांचे भाविकांकडून दान देण्यात आले आहे
4/10
पेटी क्रमांक 4 मधून सर्वाधिक 18 लाख 16 हजार 767 रुपयांचे दान मिळाले
5/10
अंबाबाई मंदिरातील दानपेट्या भरल्यानंतर साधारण पावणे दोन महिन्यांनी देवस्थान समितीकडून रक्कम मोजली जात होती.
6/10
त्यामुळे मोजदाद करण्यासाठी बराच वेळ जात होता.
7/10
त्यामुळे आता साधारण 26 दिवसांनी दानपेट्या उघडून मोजदाद केली जात आहे.
8/10
त्यानुसार सोमवारपासून पेट्यांमधील रकमेची मोजदाद सुरू होती.
9/10
गेल्या दोन दिवसांत 61 लाख 38 हजार 765 रुपयांची भर पडली होती.
10/10
चिल्लरसह मोजणी पूर्ण झाली असून अखेरच्या दिवशी 98 हजार 65 रुपयाची भर पडली.
Published at : 12 Jul 2023 07:17 PM (IST)