Health Tips : पावसाळ्यात वाढू शकतो मधुमेहाचा धोका; आजाराला टाळण्यासाठी 'अशी' घ्या काळजी
मधुमेहाच्या रुग्णांनी रात्री खूप हलका आहार घ्यावा. जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल तर रात्री कार्बोहायड्रेट आणि गोड पदार्थ खाणे टाळा. मधुमेहामध्ये रात्रीच्या वेळी कोणता आहार असावा हे जाणून घ्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही रात्री सूप घेऊ शकता. विशेषतः भाज्यांपासून तयार केलेले सूप तुमच्यासाठी आरोग्यदायी ठरेल.
हिरव्या पालेभाज्या, फरस्बी यांची भाजी खाल्ल्यास नक्कीच तुम्हाला फायदा होईल.
याशिवाय रात्री ओट्स, नाचणी, बाजरीच्या पिठापासून तयार केलेल्या 1 ते 2 चपात्या आणि मसूर खा. यापेक्षा जास्त खाऊ नका.
जर तुम्हाला काही खायला आवडत नसेल तर रात्री फक्त 1 ग्लास दालचिनीचे पाणी प्या. यामुळे तुमचा मधुमेह नियंत्रणात येण्यास मदत होईल.
मधुमेहाच्या रुग्णांनी रात्री मिठाई खाऊ नये. त्यामुळे तुमच्या रक्तातील साखर वाढू शकते. त्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या वाढतात.
रात्री तळलेले पदार्थ खाणे टाळावे. यामुळे तुमची समस्या वाढू शकते. (PC : Freepik)