Kolhapur News : सुळकूड योजनेतून पाण्यासाठी इचलकरंजीकर एकवटले, मानवी साखळीने वेधले लक्ष
इचलकरंजी शहरातील सांगली रोड परिसरातील सांगली नाका ते महासत्ता चौक पर्यंत क्रांती दिनानिमित्त सुळकूड पाणी योजनेसाठी मानवी साखळी आंदोलन करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी सांगली नाका, आसरानगर, शिक्षक कॉलनी, गुलमोहर कॉलनी, वृंदावन कॉलनी, निशिगंध हौसिंग सोसायटी, सुरभी कॉलनी, साईट क्र.102, पाटील मळा, ऋतुराज कॉलनी, आदिनाथ हौसिंग सोसायटी, आदी भागातील नागरिक उपस्थित होते.
इचलकरंजीसाठी सुळकूड योजना मंजूर होऊन देखील आजरोजी अनेक गावांच्या विरोधामुळे ही योजना रखडली आहे.
वारणा पाणी योजना विरोधामुळे रखडली त्याच प्रमाणे सुळकूड योजना देखील रखडली आहे.
काही लोकप्रतिनिधिनी इचलकरंजीच्या जनतेने दूधगंगेचे पाणी मागण्याचे धाडस करू नये, अशी घोषणा केल्यामुळे इचलकरंजीतील जनता संतप्त झाली होती.
इचलकरंजी शहरातील सांगली रोड परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन ठीक ठिकाणी बैठक घेऊन लोकांच्यात जनजागृती करण्यास सुरुवात केली व मानवी साखळी केली.
सांगली रोड परिसरातील सर्व पक्षीय सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील सुळकूड पाणी योजनेच्या समर्थनार्थ गट तट व राजकारण बाजूला ठेवत एकीने पाण्यासाठी लढा देण्याचा संकल्प केला.
त्याचाच भाग म्हणून ऑगस्ट 09 म्हणजेच क्रांतिदिनानिमित्त सांगली नाका ते महासत्ता चौक पर्यंत सुळकूड पाणी योजना समर्थनार्थ मानवी साखळी आंदोलन करण्यात आले.
भविष्यात सुळकूड पाणी इचलकरंजीला आणण्यासाठी याहून देखील तीव्र आंदोलनाचा इशारा इचलकरंजी शहरवासियांनी दिला.
याप्रसंगी सांगली रोड परिसर, सांगली नाका ते महासत्ता चौक भागातील सर्व पक्षीय सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते