Pune Landslide : पुण्यातील पदरवाडी इथल्या डोंगराला तब्बल 300 मीटरच्या भेगा
पुणे जिल्ह्यात पुन्हा भूस्खलनाची भीती व्यक्त केली जातीये. खेड तालुक्यातील पदरवाडी येथील डोंगराला तब्बल तीनशे मीटरच्या भेगा पडलेल्या आहेत.
Pune Padarwadi Mountain Crack
1/6
पुणे जिल्ह्यात पुन्हा भूस्खलनाची भीती व्यक्त केली जातीये. खेड तालुक्यातील पदरवाडी येथील डोंगराला तब्बल तीनशे मीटरच्या भेगा पडलेल्या आहेत. सुदैवाची बाब इतकीच आहे की इथली पंधरा कुटुंब ही भेगा पडलेल्या डोंगराच्या वरच्या बाजूस वास्तव्यास आहेत. मात्र खालचा भाग कोसळला तर या घरांना धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
2/6
या पंधरा कुटुंबात साधारण ऐंशी व्यक्ती राहतात तर शंभरच्या आसपास दुभती जनावरं आहेत. पावसाचा जोर वाढला की या सर्वांची झोप उडून जाते. म्हणूनच मंगळवारी प्रशासनाने पुन्हा एकदा जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली अन संभाव्य धोका टाळण्यासाठी तात्पुरते पुनर्वसन तातडीनं करण्याची गरज असल्याचं नमूद केलं.
3/6
माळीण, तळीये अन इर्शाळवाडीमध्ये झालेली मोठी हानी आज ही भरुन निघालेली आहे. हे पाहता इथे दुर्घटना घडण्याची वेळ न पाहता, सरकारने यांचं पुनर्वसन तातडीने करण्याची गरज आहे.
4/6
पदरवाडीच्या डोंगराला पडलेली ही भेग 1 ऑगस्टला ग्रामस्थांच्या नजरेत पडली. 2 ऑगस्टला ही बाब प्रशासनाच्या कानावर टाकण्यात आली. त्यानंतर प्रशासनाचे एक पथक घटनास्थळी रवाना झालं. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागालाही इथला अहवाल पाठवण्यात आलेला आहे.
5/6
मात्र या भागातील पावसाचा जोर पाहता नागरिकांची झोप उडालेली आहे. म्हणूनच काल प्रशासनाने पुन्हा एकदा प्रत्यक्ष पाहणी केली अन संभाव्य धोका टाळण्यासाठी या पंधरा कुटुंबीयांचं तात्पुरते पुनर्वसन करण्याची गरज असल्याचं बीडीओ यांनी नमूद केलं. मात्र ग्रामस्थांनी कायमस्वरूपी पुनर्वसन करावं अशी मागणी केलेली आहे.
6/6
दुसरीकडे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने धोका नसल्याचं कळवलं आहे, अशी माहिती तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली. त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने आम्ही तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवू असं आश्वासन बीडीओ विशाल शिंदेंनी दिली.
Published at : 09 Aug 2023 02:07 PM (IST)