Wheat : देशात गहू खरेदीत 43 टक्क्यांची वाढ
मोदी सरकारच्या (Modi government) काळात देशात गहू खरेदीत (wheat purchase) मोठी वाढ झाल्याची माहिती कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर (Minister Narendra Singh Tomar) यांनी दिली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2014 पासून आत्तापर्यंत गहू खरेदी 43 टक्क्यांची वाढ झाल्याचे तोमर म्हणाले.
2005 ते 2014 मध्ये 1 हजार 972 लाख मेट्रीक टन गव्हाची खरेदी होती. यामध्ये मोठी वाढ 2014 ते 2023 मध्ये गव्हाची खरेदी ही 2 हजार 811 लाख मेट्रीक टन झाली असल्याची माहिती कृषीमंत्री तोमर यांनी दिली.
देशात मोठ्या प्रमाणात गव्हाचे उत्पादन घेतलं जाते. दरवर्षी सरकारकडून आधारभूत किंमतीनं या गव्हाची खरेदी केली जाते.
यावर्षी देखील मोठ्या प्रमाणात सरकारकडून गव्हाची खरेदी केली जात आहे. दरम्यान, काही भागात अतिवृष्टीचा तर काही भागात अति उष्णतेचा फटका गहू पिकाला बसला आहे.
यावर्षी हरियाणा आणि पंजाबमध्ये गव्हाच्या खरेदीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. गहू खरेदी केल्यानंतर लगेच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेही पाठवले जात आहेत.
सध्या गव्हाचा एमएसपी 2,125 रुपये प्रति क्विंटल आहे.
वाढत्या गव्हाच्या (Wheat) आणि तंदळाच्या (Rice) किंमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारनं पावले उचलली आहेत
2014 ते 2023 मध्ये गव्हाची खरेदी ही 2 हजार 811 लाख मेट्रीक टन झाली आहे.