Kalammawadi Dam : तळ गाठूनही गेल्यावर्षी तुलनेच तीन दिवस आधीच काळम्मावाडी धरण सांडव्यापर्यंत भरले
कोल्हापूर शहराला स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी थेट पाईपलाईन टाकण्यात आलेल्या काळम्मावाडी धरणात 80 टक्के पाणीसाठा झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाळम्मावाडी धरण सांडवा पातळीपर्यंत भरले आहे.
गेल्यावर्षीच्या तुलनेत या पातळीपर्यंत काळम्मावाडी धरण तीन दिवस आधीच भरले आहे.
गळतीमुळे विशेष म्हणजे धरणातील कमी करण्यात आलेला संचय आणि उन्हाळ्यात धरणात तळ गाठल्याने चिंता लागून राहिली होती.
मात्र, जुलै महिन्यात झालेल्या धुवाँधार पावसाने धरणात पाणीसाठा वेगाने झाला आहे.
पाणीसाठा कमी करण्यासाठी पाच वक्राकार दरवाजातून एक हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे.
पायथ्याच्या वीज गृहात जनित्र संचात तांत्रिक बिघाड झाल्याने विसर्ग सुरू करण्यास अडसर आहे.
त्यामुळे वक्राकार दरवाजातून विसर्ग सुरू आहे. वक्राकार दरवाजावरून दूधगंगा नदीपात्रात विसर्ग सुरु आहे.
धरण 20.2 टीएमसी म्हणजेच 79.54 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे.
केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन संस्थेच्या निकषानुसार सध्याचा पाणीसाठा झाला आहे.