Yes Bank : येस बँकेची दमदार कामगिरी सुरुच , तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
येस बँकेच्या नफ्यात तिप्पट वाढ झाली आहे. डिसेंबरला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत येस बँकेचा निव्वळ नफा 612 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. येस बँक ही खासगी क्षेत्रातील बँक असून या बँकेनं जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत निव्वळ नफा 231 कोटी रुपये कमावला होता.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयेस बँकेचं तिसऱ्या तिमाहीत एकूण उत्पन्न 9341 कोटी रुपये इतकं आहे. 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीत हे उत्पन्न 8179 कोटी रुपये होतं, अशी माहिती येस बँकेकडून देण्यात आली आहे.
व्याज उत्पन्नात 6984 कोटी रुपयांवरुन 7829 कोटी रुपये वाढ झाली आहे. 2023-24 च्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत तर, निव्वळ व्याज उत्पन्नात 10 टक्क्यांची वाढ झाली असल्याची माहिती बँकेनं दिली. गेल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीत व्याजापोटी मिळणारं निव्वळ उत्पन्न 2017 कोटी रुपये होतं ते 2224 कोटी रुपये झालं आहे.
बँकेचं ग्रॉस एनपीए गुणोत्तर 1.6 टक्क्यांवर आलं आहे जे 2 टक्के होतं. म्हणजेच एनपीए, थकित कर्ज याचं प्रमाणं 0.5 टक्क्यांनी घटलं आहे. दरम्यान येस बँकेचा शेअर सध्या 18.24 रुपयांवर आहे.
येस बँकेचं बाजारमूल्य 57184 कोटी रुपये आहे. तर,स्टॉकचा पीई 31.9 रुपये आहे. आरओसीई 5.81 टक्के आहे. आरओई 3.11 टक्के तर बुक वॅल्यू 14.6 रुपये आहे. शेअरचं दर्शनी मूल्य 2 रुपये आहे. (टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)