Kolhapur News: लोकराजा शाहू महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला राधानगरी धरणातील बेनझीर व्हिला दिसतो तरी कसा?
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी पाणीदार कोल्हापूरसाठी राधानगरी धरणाचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण होण्यासाठी ज्या ठिकाणी तळ ठोकला तो म्हणजेच बेनझीर व्हिला होय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतोच बेनझीर व्हिला आज अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे.
शाहूंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या व्हिलाचा श्वास भोवती वाढलेल्या झाडाझुडपांनी श्वास कोंडून गेला आहे.
व्हिला बांधल्यापासून आतापर्यंत केवळ ती चारवेळा पाहण्यास उपलब्ध झाली आहे.
बेनझीरचा अर्थ एकमेवाद्वितीय किंवा अप्रतिम असा होतो. हे नाव दस्तुरखुद्द राधानगरी धरणाचं स्वप्न पाहणाऱ्या शाहू महाराजांनीच दिलं आहे. यासाठी 1912 मध्ये शासकीय दप्तरी ठराव केल्याची नोंद आहे.
राधानगरी धरणाची निर्मिती होत असताना तेथील कामकाजावर लक्ष ठेवता यावे, तसेच हे धरण पूर्णत्वास लवकर जावे यासाठी स्वत: शाहू महाराजांनी बेनझीर व्हिलाची पायाभरणी करत देखणी आणि अप्रतिम नजारा असलेली जागा निवडली.
या व्हिलाची प्रत्येक भिंत महाराजांचा रयतेच्या कल्याणासाठी जो दृढनिश्चय होता त्याची ती साक्षीदार आहे.
चुना आणि वाळूमध्ये बांधलेली ही आकर्षक व ऐतिहासिक वारसा असलेली वास्तू आहे.
ही वास्तू धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्यामध्ये सापडल्याने आजतागायत दुर्लक्षितच राहिली आहे. गेल्या 68 वर्षांमध्ये केवळ चारवेळा ही वास्तू जवळून पाहता आली आहे.
राज्यात 1972 मध्ये भीषण दुष्काळ पडला होता. तेव्हा पहिल्यांदा बेनझीर व्हिला वास्तू झाली होती. यानंतर असाच बाका प्रसंग 2016 आणि 2019 मध्ये बेनझीर व्हिला खुला झाला. यानंतर यंदा भीषण परिस्थिती ओढावल्याने ती पुन्हा खुली झाली आहे. व्हिला पाहण्यासाठी उत्तरेकडील किनाऱ्यावरुन राऊतवाडीमधून जावे लागते.