Kolhapur Rain Update: कोल्हापूर, सातारा जिल्ह्याला हवामान विभागाकडून रेड अलर्ट, अतिमुसळधार पावसाची शक्यता
कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाने जोर पकडल्याने पंचगंगा नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंचगंगा नदीचे पाणी गायकवाड वाड्यापर्यंत आल्याने गंगावेश ते शिवाजी पूल मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
आज (23 जुलै) दुपारी तीनपर्यंत पंचगंगेची पाणी पातळी 38 फुट 2 इंचावर पोहोचली आहे.
पंचगंगा नदी इशारा पातळी 39 व धोका पातळी 43 फुट आहे. जिल्ह्यातील 82 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
हवामान विभागाने कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट दिला आहे.
दोन्ही जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापुरात पंचगंगा नदी इशारा पातळीकडे गेल्याने जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे.
नदीकाठच्या गावातील लोकांना आता जिल्हा प्रशासनाबरोबरच ग्रामपंचायतकडूनही वेळीच स्थलांतरित होण्याचा सूचना दिल्या जात आहेत.
कोल्हापुरात महापुराचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या आंबेवाडी आणि चिखली गावात सध्या ग्रामपंचायतकडून स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील राधानगरी धरणात 6.78 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. धरणात 81 टक्के पाणीसाठा झाला आहे.
धरणांच्या स्वयंचलित दरवाज्यांपर्यंत पाणी आल्याने ते लवकरच उघडण्याची शक्यता आहे.