कोल्हापुरात तीन दिवस महिला बचत गटाच्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री; जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते उद्घाटन
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांच्या संयुक्त विद्यमाने नव तेजस्विनी -महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पांतर्गत बचत गटाच्या उत्पाादनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते करण्यात आले
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी महिलांनी उद्योग व्यवसाय उभारुन सक्षम व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले.
यावेळी बचत गटातील ज्येष्ठ महिला नवसाताई पाटील यांच्या हस्ते फीत कापून स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे, नाबार्डचे सहायक महाव्यवस्थापक आशुतोष जाधव, उमेद अभियानाच्या जिल्हा अभियान व्यवस्थापक वनिता डोंगरे, कोल्हापूर महानगरपालिकेचे डेएलएलएमचे कार्यक्रम अधिकारी रोहित सोनुले आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, जिल्ह्यातील 70 हजारहून अधिक महिला बचत गटांशी जोडल्या गेल्या आहेत.
महिला आपले घर, संसार सांभाळून बचत गटांच्या माध्यमातून उद्योग व्यवसायाकडे वळल्या आहेत.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई म्हणाल्या, सध्या मॉल आणि ऑनलाईन शॉपिंगद्वारे खरेदीकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. यात टिकून राहण्यासाठी बचत गटांतील मालाचे दर्जेदार पध्दतीने ब्रँडिंग आणि पॅकेजिंग होणे आवश्यक आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे म्हणाले,वैयक्तिक लाभाबरोबरच बचत गटातील महिलांनी अधिकाधिक संख्येने एकत्र येवून कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा.
आशुतोष जाधव यांनी विमा सुरक्षा, डिजिटल पेमेंट, बचत गटांच्या माध्यमातून महिलांचा विकास आदी बाबत मार्गदर्शन केले.
प्रदर्शनातील स्टॉल मधील विविध उद्योगांची माहिती घेऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
माविमचे सचिन कांबळे यांनी प्रास्ताविकातून नव तेजस्विनी -महाराष्ट्र ग्रामीण उद्यम विकास प्रकल्पाची माहिती दिली.
19 मार्च 2023 पर्यंत सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत दसरा चौक मैदान, कोल्हापूर येथे प्रदर्शन व विक्री होत आहे.
प्रदर्शनामध्ये माविम, नाबार्ड स्थापित, जिल्हा ग्रामीण यंत्रणा (DRDA), DAY -NULM कोल्हापूर महानगरपालिकेच्या बचत गटांचे स्टाँल लावण्यात आले आहेत.
या स्टॉलमध्ये कोल्हापुरी मसाले, कोल्हापुरी चप्पल, विविध प्रकारचे तांदूळ, पापड, लोणचे, मातीची नक्षीदार भांडी, बांबूच्या विविध वस्तू, गारमेंट, तृणधान्य महत्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचावे याकरिता ज्वारी, बाजरी, नाचणी, नाचणी युक्त पदार्थ,राजगिरा याचे स्वतंत्र स्टाँल लावण्यात आले आहेत.