Banana : चेहऱ्यापासून पचनापर्यंत केळ्याचे दहा उपयोग
केळं कुस्करुन त्यामध्ये दोन मोठे चमचे मध घालावा. हा फेसपॅक 15 ते 20 मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवावा. त्यानंतर चेहरा धुवावा. यामुळे त्वचा टवटवीत होण्यासोबतच तजेलदारही होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेळी, मध आणि लिंबाचे मिश्रण पायाच्या भेगा भरण्यासाठी उपयुक्त असते. पिकलेलं केळं कुस्करुन दोन-तीन चमचे मध आणि लिंबाचा रस टाका. हे मिश्रण भेगा पडलेल्या टाचांवर लावून ठेवा. एक तासानंतर पाय कोमट पाण्याने धुवून घ्या. एक दिवसाआड पायांना असे मिश्रण लावल्यास टाचेच्या भेगा भरुन येण्यास मदत होते.
पचनाशी निगडीत त्रास असेल, तर केळे खाण्याचा फायदेशीर ठरते. कारण केळ्यामधील फायबर्ससारखे घटक शौचाला साफ होण्यास मदत करतात. त्यामुळे बद्धकोष्ठता असणाऱ्यांनी नक्की केळे खावे.
केळ्यामधील विशिष्ट घटक शरीराला ऊर्जा देतात. यात शर्करेचे प्रमाण खूप असते. त्यामुळे दुधासोबत एक केळे खाल्ल्यास कमी काळात जास्त ऊर्जा मिळते.
केळे खाल्ल्याने रक्तवाहिन्यातील रक्त पातळ होते. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होते. केळ्यातील मॅग्नेशियममुळे शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते आणि रक्त गोठून राहत नाही.
केळ्यामध्ये जास्त प्रमाणात कॅल्शियम असल्याने शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. हिमोग्लोबिन आणि लोहाची कमतरता असणाऱ्यांनी नियमित केळे खावे. त्यामुळे अॅनिमियाचा त्रास उद्भवत नाही.
जुलाब झाले असतील तर ते थांबण्यासाठी अनेक घरगुती उपाय केले जातात. दिवसातून दोन ते तीन वेळा अर्धे-अर्धे केळे खाल्ल्यास जुलाबावर चांगला परिणाम होतो.
दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी केळ्याची पिवळी साल गुणकारी आहे. केळीची साल दोन मिनिटे दातांवर घासल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो.
स्वयंपाकघरात काम करताना चटका लागल्यास त्यावर केळ्याची साल लावावी. त्यामुळे चटका लागल्यावर होणारी जळजळ थांबते आणि आराम मिळतो. तसेच चटक्यामुळे त्वचेवरील डाग लवकर निघून जातो.