Rajaram Sakhar Karkhana : चर्चा तर होणारच! 'राजाराम' कारखान्याची सभा सुरू होण्यापूर्वीच 'मंजूर'चे फलक झळकले
कसबा बावड्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची (Rajaram Sakhar Karkhana) वार्षिक सर्वसाधारण सभा आज होत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसभेसाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून जय्यत तयार करण्यात आली आहे.
त्यामुळे गोकुळनंतर आता कारखान्याच्या सभेतही सतेज पाटील (Satej Patil) आणि महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahadik) गट आमने सामने येणार आहेत.
आजच्या सभेमध्ये सर्वात मोठा मुद्दा असणार आहे तो कारखान्याच्या पोटनियमांमध्ये दुरुस्तीचा प्रस्ताव आहे.
कारखाना कार्यक्षेत्रामध्ये आणखी 44 गावांचा समावेश करण्यात येणार आहे.
मात्र, सभा सुरु होण्यापूर्वीच सभेत मंजूरचे फलक झळकल्याने चर्चा रंगली
कार्यक्षेत्र वाढवण्याला विरोधी सतेज पाटील गटाकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे.
वाढीव कार्यक्षेत्रात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील 14 गावांचा समावेश आहे.