Bollywood Kissa: सलमानने भाग्यश्रीला किस करावं, फोटोग्राफरची डिमांड अन् सलमानने केली त्याची बोलती बंद
'मैंने प्यार किया' हा बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. ज्यामध्ये सलमान खान आणि भाग्यश्रीची उत्कृष्ट केमिस्ट्री पाहायला मिळाली. आज आम्ही तुम्हाला या जोडप्याची एक रंजक गोष्ट सांगत आहोत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहा चित्रपट सलमान खानचा हिरो म्हणून पहिला चित्रपट होता. ज्यामध्ये त्याची जोडी सुंदर अभिनेत्री भाग्यश्रीसोबत दिसली होती. प्रेक्षकांनी त्यांच्या जोडीवर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला आणि या चित्रपटामुळे दोघेही रातोरात स्टार बनले. आजही चाहते हा चित्रपट मोठ्या उत्सुकतेने पाहतात आणि त्याच्या कथा ऐकण्यासाठी उत्सुक असतात.
एका प्रसिद्ध फोटोग्राफरला सलमानसोबत भाग्यश्रीचे काही हॉट फोटो काढायचे होते. पण भाग्यश्री अभिनेत्याला किस करायला आणि हॉट फोटो नकार दिला. अशा परिस्थितीत सलमानने फोटोग्राफरला असे उत्तर दिले होते ज्याने भाग्यश्रीचे मन जिंकले.
याचा खुलासा खुद्द भाग्यश्रीने एका मुलाखतीत केला आहे. तिने सांगितले होते की, आमचे फोटोशूट सुरू असताना त्याने फोटोग्राफर सलमानला बाजूला घेतले आणि सांगितले की कॅमेरा सेटअप झाल्यावर भाग्यश्रीला पकडून तिचा किस घ्या.
पण मी असे काही करणार नाही, असे फोटो हवे असतील तर आधी भाग्यश्रीला विचारा, असे सलमानने त्याला सांगितले. कारण तिच्या इच्छेशिवाय काहीही होणार नाही. सलमानचे हे ऐकून मला खूप आनंद झाला आणि मला खात्री झाली की मी त्याच्यासोबत सुरक्षित आहे असं भाग्यश्रीने सांगितलं.
या चित्रपटानंतर भाग्यश्रीने 'कैद में', 'त्यागी' आणि 'पायल' सारख्या चित्रपटात काम केले आणि त्यानंतर लग्न केले.
लग्नानंतर भाग्यश्री चित्रपटसृष्टीपासून दूर गेली. तर सलमान खान लवकरच 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझरही रिलीज झाला आहे.