Success Story : सेंद्रीय पपईतून दोन एकरात सात लाखांचे उत्पन्न
जालना (Jalna) जिल्ह्यातील राणी उंचेगाव येथील नासिर शेख (Nasir Sheikh) या शेतकऱ्यानं दोन एकरात सेंद्रिय पद्धतीनं पपईची (Organic cultivation of papaya) लागवड केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपपई शेतीतून त्यांनी सात लाख रुपयांचे उत्पन्न घेतलं आहे. योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी भरघोस उत्पादन घेतलं आहे.
नासिर शेख यांच्या 15 एकरात पारंपरिक पिकांबरोबर वर्षभरापूर्वी प्रयोग म्हणून दोन हजार पपई रोपांची लागवड केली होती. दोन रोपातील अंतर 8 बाय 6 फूट ठेवल्याची माहिती त्यांनी सांगितली.
आत्तापर्यंत साधारण 32 ते 35 टन पपईची त्यांनी विक्री केली आहे. 5 फेब्रुवारीपर्यंत या पपईला 15 ते 18 रुपये प्रति किलो असा दर मिळाला आहे.
नासिर शेख यांनी मल्चिंगचा वापर केला आहे. त्यामुळं पाण्याची मोठी बचत झाल्याची माहिती नासिर शेख यांनी दिली.
खत व्यवस्थापन, कीडरोग नियंत्रण, आंतरमशागत अशा नियोजनासाठी त्यांना साधारण एक लाख रुपये खर्च आला आहे. आत्तापर्यंत त्यांना चार लाखांचे उत्पन्न मिळाले आहे तर अजूनही झाडांवर 35 टन माल शिल्लक आहे.
आत्तापर्यंत त्यांना चार लाखांचे उत्पन्न मिळाले आहे तर अजूनही झाडांवर 35 टन माल शिल्लक आहे. यातून त्यांना तीन लाखांचं उत्पन्न अपेक्षित असल्याचे नासिर शेख म्हणाले
सेंद्रीय पपईला मोठी मागणी असते. राज्यासह देशातील इतर राज्यातही सेंद्रीय पपईला मोठी मागणी आहे. त्यामुळं दरात वाढ होत आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.
योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी भरघोस उत्पादन घेतलं आहे.
सेंद्रीय पद्धतीनं पपईच्या लागवडीतून शेतकऱ्याने चांगले उत्पन्न घेतलं आहे.