Exit Poll 2024
(Source: Poll of Polls)
Wheat : तापमान वाढलं, गहू उत्पादक शेतकरी चिंतेत
देशातील हवामानात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कधी थंडी, कधी ढगाळ वातावरण तर कधी उन्हाचा कडाका जाणवत आहे. या बदलत्या हवामानाचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळं गव्हाच्या पिकाला या वाढत्या तापमानाचा फटका बसण्याची शक्यता आहे. देशातील काही राज्यात तापमानात 10 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी उष्णतेच्या लाटेमुळं गव्हाच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. अशातच निर्यातीमुळे गहू आणि पिठाचे भाव वाढले आहेत. अशातच तापमानात पुन्हा वाढ होत आहे.
गहू उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरीप हंगामात राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह अन्य राज्यांमध्ये शेतकऱ्यांची लाखो रुपयांची पिके उद्ध्वस्त झाली होती.आता रब्बी हंगामातील पिकांना देखील फटका बसण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून थंड असलेलं वातावरण गहू पिकासाठी योग्य असल्याचे सांगण्यात आले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे.
तापमान वाढल्यामुळं गहू उत्पादक शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. वाढणारी उष्णता गव्हाच्या पिकासाठी धोकादायक आहे.
वाढत्या उष्णतेमुळं गव्हाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, झारखंडसह इतर राज्यांमध्ये तापमानात 10 अंश सेल्सिअसपर्यंतची वाढ झाली आहे.
देशात मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी झाली आहे. त्यामुळं गव्हाच्या उत्पादनात मोटी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, उष्णतेची लाट कायम राहिल्यास गव्हाच्या पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी उष्णतेच्या लाटेमुळं गव्हाच्या उत्पादनात मोठी घट झाली होती.
बदलत्या वातावरणाचा फटका शेती पिकांना बसत आहे. सध्या तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळं गव्हाच्या पिकाला या वाढत्या तापमानाचा फटका बसण्याची शक्यता आहे.