Microplastic : सावधान! नकळतपणे तुम्ही दररोज प्लास्टिक खाताय, आरोग्यावर होईल गंभीर दुष्परिणाम
तुम्ही दररोज नकळतपणे छोट्या-छोट्या प्लास्टिकच्या कणांचे सेवन करत आहात. याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होईल. (PC : istockphoto)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक पदार्थांमधून मायक्रोप्लास्टिकचे कण तुमच्या शरीरात प्रवेश करतात. या प्लास्टिकचा तुमच्या शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. (PC : istockphoto)
प्लास्टिकच्या अगदी लहान कणांना मायक्रोप्लास्टिक (Microplastic) असं म्हटलं जातं. मनुष्य नकळतपणे मायक्रोप्लास्टिकचे सेवन करतो. काही संशोधनात ही बाब समोर आली आहे. (PC : istockphoto)
काही संशोधनाच्या अहवालानुसार, जागतिक स्तरावर, दर आठवड्याला सरासरी 0.1 ते 5 ग्रॅम मायक्रोप्लास्टिक्स मानवी शरीरात वेगवेगळ्या प्रकारे प्रवेश करू शकतात. प्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण सामान्यतः अन्न, पेय आणि श्वासाद्वारे आणि त्वचेद्वारे देखील शरीरात प्रवेश करू शकतात. (PC : istockphoto)
तुम्ही दररोज नकळतपणे छोट्या-छोट्या प्लास्टिकच्या कणांचे सेवन करत आहात. याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होईल. (PC : istockphoto)
पाणी, मीठ, मासे, बिअर, साखर आणि मध या पदार्थांसोबत प्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण मानवी शरीरात प्रवेश करू शकतात. मानवी शरीरात प्रवेश केल्यानंतर, हे प्लास्टिकचे सूक्ष्म कण (5 मिमी पेक्षा कमी) पचन, श्वसन आणि रक्ताभिसरण प्रणालींमध्ये जातात. (PC : istockphoto)
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मायक्रोप्लास्टिकमुळे मानवी आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. कारण त्यांच्यातील प्रदूषित पदार्थ अनेक आजारांशी निगडीत असतात. (PC : istockphoto)
मायक्रोप्लास्टिकमुळे हृदय आणि प्रजनन संबंधित समस्या तसेच मधुमेह, लठ्ठपणा आणि कर्करोग यांसारख्या आजारांना आमंत्रण मिळू शकते. त्यामुळे संशोधकांनी मानवी शरीरात प्रवेश करणाऱ्या मायक्रोप्लास्टिक्सची संख्या आणि त्याचे संभाव्य परिणाम निश्चित करणे महत्वाचे आहे. (PC : istockphoto)
प्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण म्हणजे मायक्रोप्लास्टिकचे कण पाणी, मीठ, मासे, बिअर, साखर आणि मध यांच्यासह मानवी शरीरात प्रवेश करतात. संशोधनानुसार, प्रत्येक व्यक्ती दरवर्षी 11,845 ते 1,93,200 मायक्रोप्लास्टिक कण (7.7 ग्रॅम ते 287 ग्रॅम) गिळतो. (PC : istockphoto)
मायक्रोप्लास्टिकचा सर्वात मोठा स्त्रोत म्हणजे पिण्याचे पाणी, ज्यामध्ये नळाचे पाणी आणि बाटलीबंद (Packaged Drinking Water) पाणी समाविष्ट आहे. (PC : istockphoto)
खाद्यपदार्थ किंवा पाण्याव्यतिरिक्त मायक्रोप्लास्टिकचे कण धुळीतून मानवी शरीरात जातात. त्यामुळे आरोग्या धोका निर्माण होतो. दररोज अतिरिक्त 26 ते 130 मायक्रोप्लास्टिक कण फुफ्फुसांच्या संपर्कात येतात. बाटलीबंद पाण्यात मायक्रोप्लास्टिक्सचे प्रमाण सर्वाधिक असते. पॅकेजिंग प्रक्रियेमुळे प्लास्टिकचे अतिसूक्ष्म कण पाणी किंवा खाद्यपदार्थांमध्ये मिसळतात. (PC : istockphoto)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (PC : istockphoto)