Photo : हातात कुऱ्हाड घेऊन जेव्हा रावसाहेब दानवे काटेरी झुडपे तोडतात, पाहा फोटो
नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणारे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पुन्हा एकदा आपल्या साधेपणामुळे चर्चेत आले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकारण रोज हिरवा झेंडा दाखवून आणि फीत कापून विविध विकास कामांचे उद्घाटन करणाऱ्या रावसाहेब दानवे यांच्या हातात चक्क कुऱ्हाड पाहायला मिळाली.
रविवारी दानवे यांनी हातात कुऱ्हाड घेऊन थेट जालन्यातील घाणेवाडी (ता.जालना) येथील संत गाडगेबाबा जलाशय गाठले. तर जलाशयाच्या भिंतीवरील काटेरी झुडपे कुऱ्हाडीने तोडली.
विशेष म्हणजे, या प्रकल्पाची भिंत स्वच्छ करण्यासाठी लोकसहभागातून काम सुरू असून, त्यानिमित्ताने श्रमदान मोहिमेत रविवारी दानवे यांनी सहभाग नोंदवून श्रमदान करत सामाजिक संघटनांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले.
स्वच्छता मोहिमेत रविवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही सहभाग नोंदवला.
तर केंद्रीय मंत्री असताना देखील दानवे श्रमदान मोहिमेत दाखल झाल्याने पुन्हा एकदा त्यांचा साधेपणा पाहायला मिळाला असून, याची जोरदार चर्चा देखील पाहायला मिळत आहे.
काम कोणतेही असो त्यामध्ये लोकसहभाग महत्त्वाचा असतो. लोकसहभागातून नदीपात्रातील कचरा प्लास्टिक काढण्यासह सार्वजनिक स्वच्छता, वृक्षारोपण, श्रमदान अभियान हे जालन्यातून नवीन पॅटर्न तयार झाला असल्याचं दानवे म्हणाले.