Matheran Hill Station : गिरीस्थान 'माथेरान' झाले 173 वर्षांचे...
माथेरान (Matheran) हे संपूर्ण आशियातील एकमेव हिल स्टेशन आहे जे वाहनमुक्त आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईपासून 110 किमी. दूर रायगड जिल्ह्यात माथेरान आहे. निसर्गानं येथे मुक्त हस्तानं उधळण केली असून भारतातील हे सगळ्यात छोटं हिलं स्टेशन आहे.
सह्याद्रीच्या एका कुशीत वसलेले रायगड जिल्ह्यातील एक प्रदुषण मुक्त असे अद्वितीय पर्यटन स्थळ म्हणून माथेरानचे नाव जगाच्या नकाशावर आहे.
हा संपूर्ण परिसर हिरवाईनं नटलेला आहे. आज या ठिकाणाला १७३ वर्ष पुर्ण झाली आहेत..
माथेरान येथील मिनी ट्रेन हे पर्यटकांचे आकर्षण आहे. माथेरानची राणी' म्हणून या मिनी ट्रेनला ओळखलं जातं... माथेरान या हिल स्टेशनला इंग्रज काळापासून फार महत्व आहे
मुंबईपासून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर असलेले माथेरान हे मुंबई, पुणे, ठाणे, रायगड येथील पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. तर, राज्यातील अनेक पर्यटक हे थंड हवेचे ठिकाणी असलेल्या माथेरानला हजेरी लावत असतात.
यामध्ये, माथेरानचे निसर्गरम्य वातावरण घनदाट झाडी, घोडे हे चिमुरड्या बालकांपासून तरुण आणि वृद्धांचे आकर्षण बनले आहे
सह्याद्रीच्या एका कुशीत वसलेले रायगड जिल्ह्यातील एक प्रदुषण मुक्त असे अद्वितीय पर्यटन स्थळ म्हणून माथेरानचे नाव जगाच्या नकाशावर आहे
आपल्या धावपळीच्या आयुष्यातून थोडा वेळ काढून जर माथेरानला गेलात तर तुम्हाला नक्कीच इथं निसर्गाचा आनंद लुटता येईल
अतुल्य भारतातील सगळ्यात छोट्या हिल स्टेशनची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे इथं कोणत्याही वाहनांना प्रवेश नाही. पाहा माथेरान का आहे खास!