Photo : कृषीमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या बांधावर, पाहा फोटो

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडताना पाहायला मिळत आहे.

दरम्यान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून, परिस्थितीची माहिती जाणून घेतली.
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे बेमोसमी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीची माहिती जाणून घेतली, सोबतच त्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला आहे.
तसेच झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करावे असे निर्देश सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
तर राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा, अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सत्तार यांनी दिली आहे.
राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस लवकरच निर्णय घेतील असेही कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.