Photo: छत्रपती संभाजीनगरमध्ये 30 वर्षांचे अतिक्रमण जमीनदोस्त, पाहा फोटो
मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या वतीने रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटीव्ही सेंटर येथे महानगरपालिकेच्या शौचालयालगत वीस बाय पन्नास या आकाराच्या जागेत मागील तीस वर्षापासून असलेले चार दुकानांचे अतिक्रमण पाडण्यात आले आहे.
अनधिकृत बांधकाम करुन दहा बाय पंधराच्या जागेवर अतिक्रमण करून भजी वडापाव व चहाचे स्टॉल टाकण्यात आले होते.
महानगरपालिकेचा भाडे करारनामा काहीच नसताना सर्रास खुलेआम मागील तीस वर्षापासून अतिक्रमण सुरु होते.
त्यामुळे जिजाऊ चौकामधील हे अतिक्रमण काढण्यात आले व शौचालय जाण्यासाठी पूर्णपणे रस्ता मोकळा करण्यात आला.
यावेळी अतिक्रमण धारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, पत्र्याचे शेड व दुकानांचे ओटे,पत्र्याचे शेड काढल्यामुळे पूर्णपणे रस्ता मोकळा झाला आहे.
मागील दोन दिवसांपासून विषय गाजत असलेल्या एन-5 येथील गोखले ईमारत देखील यावेळी पाडण्यात आली आहे.
याशिवाय महानगरपालिकेच्या पथकाने छोटे-मोठे लहान बोर्ड काढून रस्ता मोकळा केला आहे.