PHOTO: चक्क भिंत तोडून लाखोंचा मुद्देमाल चोरीला, जालन्यातील अंबडमधील घटना
रवी मुंडे, एबीपी माझा
Updated at:
09 Jan 2023 08:32 PM (IST)
1
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सराफा बाजारमध्ये ज्वेलर्सचे दुकान फोडले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
यावेळी सोन्या-चांदीच्या दागिन्यासह साडेआठ लाखांचा मुद्देमाल घेऊन चोरांनी पळ काढला आहे.
3
धक्कादायक म्हणजे दुकानात प्रवेश करण्यासाठी चोरट्यांनी थेट दुकानाची भिंतच तोडली असल्याचे समोर आले आहे.
4
चोरट्यांनी दोन मोठे गॅस कटर व एक लहान गँस सिलेन्डर, लोखंडी रॉड, दोन लोखंडी गिरमिट, कानस व इतर साहित्याच्या मदतीने दुकानाच्या पाठीमागील लोखंडी दरवाजा गॅस कटरने कापला.
5
आत प्रवेश केल्यावर दुकानातील दोन लहाण लोखंडी तिजोरी गॅस कटरने कापले.
6
तसेच कपाटातील सोन्या-चांदी दागिने लंपास केले.
7
मात्र याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.