In Pics : पुण्यात वाहनांची तोडफोड करणारी टोळी सक्रिय

वाहनांची तोडफोड करणारी टोळी सक्रीय झाली आहे. गेल्या दहा दिवसांपासून पुण्यात रात्री मध्यरात्री काही तरूण टोळकी तोंडाला मास्क लावून हातात दगड, दांडकी घेवून गाड्यांची तोडफोड करत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास गोखले नगर भागात टोळक्यानी गाड्यांची तोडफोड केली

या तोडफोडीत दुचाकी आणि चारचाकी गाड्यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्या तर दुचाकी गाड्यांच्या पेट्रोलच्या टाक्या फोडल्या.
यामध्ये पाच ते सहा जणांच्या टोळक्यानी हातात शस्त्र घेऊन ही तोडफोड केली.
तोडफोड होत असताना देखील आरोपींच्या हातातील शस्त्रे पाहून लोक घरा बाहेर आले नाहीत.
गेल्या काही महिन्यापासून पुण्यात प्रचंड गुन्हेगारी वाढली आहे. मागील काळात नवीन पोलीस आयुक्त आल्यानंतरही पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले.
गोखले परिसरात गाड्यांची तोडफोड झाली आहे.