Ganeshotsav: माजी मंत्री अर्जुन खोतकरांच्या घरी 'बाप्पा'चे आगमन, पाहा फोटो
माजी मंत्री व शिवसेना नेते (शिंदे गट) अर्जुन खोतकर यांच्या जालना येथील दर्शना या निवासस्थानी बाप्पाचे मोठ्या थाटात आगमन झाले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावेळी अर्जुन खोतकर यांच्यासह पत्नी सीमा खोतकर आणि संपूर्ण कुटुंबाने विधिवत पूजा करत बाप्पांच्या मूर्तीची स्थापना केली.
दरवर्षी खोतकर कुटुंबिय लाडक्या बाप्पाची मोठ्या हर्ष उल्हासात घरी प्राणप्रतिष्ठा करत असतात.
दरम्यान यंदाही मोठ्या उत्साहात खोतकर कुटुंबीयांनी बाप्पाला आपल्या घरी आणले.
यावेळी बाप्पाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मोठी सजावट करण्यात आली होती.
गणपती बाप्पा मोरया अशी घोषणा देत खोतकर कुटुंबीयांनी बाप्पांचे स्वागत केले.
यावेळी अर्जुन खोतकर यांच्या हस्ते आरती करून गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
तर, यावेळी दुष्काळाचे दुष्टचक्र पाहता गणपतीच्या या 10 दिवसात वरुण राजाची कृपा व्हावी आणि शेतकऱ्यांचे विघ्न दूर होऊ दे अशी प्रार्थना यावेळी अर्जुन खोतकरांनी गणरायाला केली.