ज्वेलरीचा नवा ट्रेण्ड! पारंपरिक दागिन्यांना आधुनिक साज; कोरियन, टर्किश, यूएससह अरब देशातील डिझाईनला बाजारात मोठी मागणी
नोकरीच्यानिमित्ताने खानदेशातील अनेक तरुण आणि तरुणी विदेशात स्थायिक होत आहे.तिथे स्थायिक झाल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या दागिन्यांच्या डिझाईनची भुरळ ही त्यांना पडत आहे
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजळगावच्या सुवर्ण नगरीत ही त्याचे पडसाद आता दिसू लागले आहेत.
ग्राहक आता आपल्या मुलांच्या आवडीच्या विदेशी दागिन्यांची बाजारात मागणी करत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे
सध्या लगीनसराई संपत आली असली असली तरी अधिक महिना आता जवळ येऊन ठेपला आहे.
ग्राहक आपल्या जावई आणि लेकीसाठी या विदेशी दागिन्यांच्या डिझाईनची मागणी करताना जळगाव चे बाजार पेठेत दिसत आहेत
विदेशी दागिन्यांच्या डिझाईनमध्ये कोरियन, इटालियन, यू एस सह अरब देशातील डिझाईनला मोठी मागणी आहे.
सोने व्यावसायिकांनी देखील अशा डिझाईनची दागिने जळगावमध्ये तयार करून ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिल्याचे पाहायला मिळत आहे
विदेशात राहणाऱ्या मुलीने तिला आवडत असलेल्या विदेशी डिझाईन मोबाईलवर पाठवल्या आहेत
त्यानुसार जळगावमधून दागिने खरेदी करून मुलांना देणार असल्याचे ग्राहक सांगतात